Share

सहकार मंत्र्यांचा विजय तर शशिकांत शिंदे-शंभूराज देसाईंना पराभवाचा धक्का

Published On: 

🕒 1 min read

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. यामध्ये २१ पैकी ११ उमेदवार हे बिनविरोध झाल्यामुळे १० जागांच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता काही धक्कादायकी निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादीचे आमदार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील(Balasaheb Patil) हे विजयी झाले आहेत. तर, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे(Shashikant Shinde), शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांना पराभवाचा धक्का मिळाला आहे.

जावळी सोसायटी गटातून शशिकांत शिंदे यांचा केवळ एका मताने पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. पाटण विकास सेवा सोसायटी गटात सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले असून त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी राहिलेले शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला.

दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. तसेच जावळी तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील वाद झाल्याचे चित्र मतदान केंद्रावर पहायला मिळाले होते. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!