Share

…याचे राज्यकर्त्यांनी दररोज सिंहावलोकन करायला हवे- एन. व्ही. रमण

Published On: 

पुट्टपर्ती (आंध्र प्रदेश) : सोमवारी(२२ नोव्हें.) पुट्टपर्ती येथील श्री सत्य साई इन्स्टिटय़ूट ऑफ हायर लर्निग या संस्थेच्या ४० व्या पदवीदान समारंभात बोलत असतांना सरन्यायाधीश एन. व्ही. रमण(NV Ramana) यांनी आपण घेतलेले निर्णय चांगले आहेत काय, तसेच त्यांची काही वाईट वैशिष्टय़े आहेत काय, याचे राज्यकर्त्यांनी दररोज सिंहावलोकन करायला हवे, असे मत व्यक्त केले. तसेच राज्यकर्त्यांचे १४ वाईट गुण असून त्यांनी ते टाळावेत, असे न्या. रमण यांनी महाभारत व रामायण यांचा दाखला देऊन सांगितले.

पुढे ते म्हणाले की,’लोकशाही व्यवस्थेतील सर्व राज्यकर्त्यांनी आपले दैनंदिन काम सुरू करण्यापूर्वी आपल्यात काही अवगुण आहेत का, याचे आत्मपरीक्षण करावे. न्याय प्रशासन देण्याची गरज असून ते लोकांच्या गरजेनुसार असावे. येथे अनेक ज्ञानी लोक असून, जगात व देशात चाललेल्या घडामोडी तुम्ही पाहात आहात.’

दरम्यान, देशातील सर्व यंत्रणा स्वतंत्र व प्रामाणिक असाव्यात आणि त्यांचा हेतू लोकांची सेवा करण्याचा असवा. दुर्दैवाने आधुनिक शिक्षण व्यवस्था केवळ उपयुक्ततावादी कार्यावर भर देत असून, अशी व्यवस्था विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवणाऱ्या शिक्षणाच्या नैतिक किंवा आध्यात्मिक पैलू हाताळण्यास सक्षम नाही, असेही रमण यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!