Share

‘सारेगमप’चे परिक्षक ट्रोल ; मृण्मयी देशपांडेचं सडेतोड उत्तर

Published On: 

मुंबई : झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हा प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम लवकरच पुन्हा एकदा त्यांच्या भेटीस आला. याधीच्या या कार्यक्रमातील स्पर्धकांनी लोकांच्या मनात आपलसं स्थान निर्माण केल होत. यातील आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत यांनी त्यांच्या सुमधूर गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.

आता पुन्हा एकदा ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हा कार्यक्रम एक नवीन रूपात येऊन या कार्यक्रमात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मधील आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत परिक्षक म्हणून दिसले. मात्र या परिक्षकांना शोमधील त्यांच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगमुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं गेलं. परिक्षकांना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला आता ‘शो’ची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडेने सडेतोड उत्तर दिलं आहे.

मृण्मयी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकताच मृण्मयीला एका ट्रोलरने ‘सारेगमप’च्या परिक्षकांना ट्रोल करत कमेंट केली, ‘समोर असलेले जज आणि अँकर खूपच आरडा ओरडा करतात.’ यावर मृण्मयीने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. तिच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. मृण्मयीने कमेंट केली, ‘तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? हाताची घडी घालून शांत बसला असतात का?’. मृण्मयीने दिलेल्या या प्रतिउत्तराचं अनेकजण समर्थन करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!