🕒 1 min read
मुंबई : आपल्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांमध्ये लोकप्रियता निर्माण करतात. अभिनेत्री सारा अली खान ही त्यापैकी एक आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. साराने नुकतेच केदारनाथ मंदिरातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
सारने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. केदारनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर साराने हे फोटो काढले आहेत. यावेळी सारासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर देखील एकत्र असल्याचे दिसतं आहे. सारने बरेच फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी काही फोटो हे केदारनाथचा तिचा प्रवास दाखवत आहेत. तर काही फोटोंमध्ये ती आणि जान्हवी हिमालयासमोर पोज देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत ‘जिथे सुरुवात झाली तिथे परत’, अशा आशयाचे कॅप्शन साराने दिले आहे.
https://www.instagram.com/p/CVu29AUp9yc/?utm_source=ig_web_copy_link
साराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. साराचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र, तिला ट्रोल केले आहे. शिवाय ब्लेस यू, हिंदू-मुस्लीम चा काही प्रश्नच नाही, ‘लाज वाटली पाहिजे तुला एक मुस्लीम असुन देवाचे दर्शन घेते.’ ‘आता इस्लाम धोक्यात येईल,’ मिस यू सुशांत, सारा अली बेस्ट अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी साराला ट्रोल केले आहे. सारा आणि जान्हवी कपूर या दोघांनी रणवीर सिंहचा ‘द बिग पिक्चर’ या शोमध्ये हजेरी लावली आहे. साराचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट गेल्यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होतो. तर, काही दिवसांपूर्वी सारा ‘अतरंगी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धानूष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- शिवसेनेच्या वाघिणीने मैदान मारलं, मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दारूण पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
