Share

सारा अली खानने बॉडीगार्डला सुनावले; कारण वाचून कराल कौतुक

Published On: 

मुंबई : अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) तिच्या बॉडीगार्डला नुकतेच सुनावले आहे. तिच्या बॉडीगार्डने एका फोटोग्राफरला धक्काबुक्की केली होती. झाले असे की, सारा अली खान तिच्या आगामी ‘अतरंगी रे’ (‘Atrangi Re’)  या चित्रपटातील ‘चका चक’ (Song ‘Chaka Chak’) या पहिल्या गाण्याच्या लाँचिंगला पोहोचली. याच कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सारा तिच्या बॉडीगार्डनेच्या कृत्याबद्दल माफी मागताना दिसत आहे.

दरम्यान ‘चका चक’ या पहिल्या गाण्याच्या लाँचिंगच्या वेळी सारा जबरदस्त स्टाइलमध्ये साडी नेसून डान्स करताना दिसत आहे. जेव्हा हा कार्यक्रम संपला तेव्हा ती गाडीजवळ असलेल्या फोटोग्राफर्सशी बोलताना दिसते. ‘कुठे आहे तो? जो धक्का लागून पडला’ असे सारा फोटोग्राफरला विचारते. त्यानंतर ती ‘ज्या व्यक्तीला धक्का लागला ती निघून गेली’ असे बोलताना दिसते. सारा तिच्या बॉडीगार्डला बोलते की, ‘तुम्ही कृपया कुणाला धक्का देऊ नका, कृपया असे करु नका.’ सारा तेथे उपस्थित असलेल्या सर्व फोटोग्राफरची माफी मागते.

साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी साराची वागणूक पाहून तिचे कौतुक केले आहे. अनेकांनी ‘सारा खूप चांगली आहे’ , ‘खूप छान’ असे नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटले आहे. ‘अतरंगी रे’ या चित्रपटात अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘चका चक’ गाण्यातील साराच्या काही हटके अदा पहाच.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!