Share

संजयजी, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आपण का पूर्ण करत नाही?; नवनीत राणांचा संतप्त सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. राज्य सरकारनं महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढवण्याची मागणी मान्य केली असली तर एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यावरून आता नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

केंद्र सरकारने या दिवाळीनिमित्त संपूर्ण देशासह महाराष्ट्राला दिवाळी भेट म्हणून पेट्रोल आणि डिझेलवर सूट दिली आहे. यावरून संजय राऊत यांनी केंद्रसरकारवर टीका केली. मात्र आता नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन संजय राऊत यांना धारेवर धरलं आहे. ‘संजय राऊत आपण केंद्रावर प्रत्येक गोष्टीवरुन टीका करता पण आपल्या महाराष्ट्रात एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. दिवाळीच्या दिवशी आंदोलन करत आहेत. त्यांची मागणी आपण का पूर्ण करत नाही?,’ असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बुधवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही राज्य सरकारांनी देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!