Share

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे; राऊतांचा कॉंग्रेस नेत्यांना मोलाचा सल्ला

Published On: 

मुंबई : काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने युपीएचं नेतृत्व बदलाची वक्तव्य करत आहेत. युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असं ते सातत्याने म्हणत आहेत. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही बोललो, ते शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का? ज्या गोष्टींशी संबध नाही त्या गोष्टींवर संजय राऊत यांनी चर्चा करू नये. इतकाच आमचा सल्ला आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी पटोले आणि काँग्रेस नेत्यांच्या टीकेला उत्तर दिलं असून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे. तसंच या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी भाष्य केल्यास आपण त्यांना उत्तर देऊ असंही सांगितलं आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “शरद पवार या देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. युपीएसंबंधी बोलण्यासाठी युपीएमध्ये असायला पाहिजे असं काही नाही. युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये.

पुढे बोलताना हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात एका मजबूत विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हायची असेल तर मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणं गरजेचं आहे. हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे”.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!