मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना १ जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिले चार सामने गेल्या वर्षी खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. भारतीय संघाला ही कसोटी मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे यात शंका नाही, पण या कसोटीत भारताचा पराभव झाला तर ही कसोटी मालिका अनिर्णित राहील. या कसोटी सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा खेळणार नसल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत माजी कर्णधार आणि वरिष्ठ फलंदाज विराट कोहलीवर धावा करण्याचे खूप दडपण असणार आहे.
कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावांच्या खेळीचा विक्रम
एजबॅस्टन बद्दल बोलायचे झाले तर, विराट कोहलीची या मैदानावर चांगली कामगिरी राहिली आहे. विराट या मैदानावर कसोटीत भारतासाठी सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज आहे. विराट कोहलीने २०१८ मध्ये एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात २२५ चेंडूत २२ चौकारांच्या मदतीने १४९ धावा केल्या होत्या. त्याचवेळी दुसऱ्या डावात त्याने ५१ धावा केल्या होत्या. या सामन्यात मात्र भारतीय संघाचा ३१ धावांनी पराभव झाला आणि त्यावेळी कोहलीच संघाचा कर्णधार होता.
एजबॅस्टन येथे भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये दुसरी सर्वोच्च वैयक्तिक खेळी खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने येथे खेळलेल्या कसोटीत सामन्यात १२२ धावांची सर्वोत्तम खेळी खेळली होती. तर मोहिंदर अमरनाथ ७९ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर, गुंडप्पा विश्वनाथ ७८ धावांसह चौथ्या आणि एमएस धोनी ७७ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
एजबॅस्टन येथे भारतासाठी कसोटीत सर्वोत्तम खेळी खेळणारे फलंदाज
१४९ – विराट कोहली
१२२ – सचिन तेंडुलकर
७९ – मोहिंदर अमरनाथ
७८ – गुणडप्पा विश्वनाथ
७७ – एमएस धोनी
महत्वाच्या बातम्या :


