🕒 1 min read
नवी-दिल्ली : मराठी भाषा आणि मराठी अस्मिता टिकवण्यासाठी आता राज्य सरकारने आता मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला असून यापुढे सर्व दुकानांवरच्या पाट्या या मराठी भाषेतच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर काल(१३ जाने.) मनसेप्रमुख राज ठाकरेंनी(Raj Thackeray)ठाकरे यांनी आता कच खाऊ नका. याची अंमलबजावणी नीट करा असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या या सल्ल्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे.
यासंदर्भात दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,’कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हापासून आंदोलन सुरु आहे. आमची स्थानिय लोकाधिकार समिती, अन्य संघटना आजही या प्रकारचं काम करतात. अनेक पक्ष आमच्या पक्षातून बाहेर गेले आहेत, पण जाताना तोच विचार घेऊन बाहेर गेले आहेत. कोण काय बोलतं यावर महाविकास आघाडी किंवा शिवसेनेचं धोरण ठरत नाही.’ तसेच मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे. मराठी अस्मिता राहणार, त्याच्याशी कधी तडजोड करणार नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.
तसेच याविषयी ट्विट करत राज ठाकरे म्हणाले होते की,’ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच.’
#राजभाषा_मराठी #महाराष्ट्र_धर्म pic.twitter.com/MQhQ4DGcvk
— Raj Thackeray (@RajThackeray) January 13, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’महाराष्ट्र सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा. यामध्ये आणखी एक भानगड सरकारनं करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा-पुन्हा आम्हाला करायला लावू नका’, असेही ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा?”, मनसेचा इशारा
- नोटीस देणे, ट्विट करणे, मिडियाबाजी ही निव्वळ स्टंटबाजी; करुणा मुंडेंचा रुपाली चाकणकरांना टोला
- “उत्तरप्रदेशातील उपेक्षित, शोषित समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शिवसेना वचनबद्ध”
- “ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा”, पंतप्रधान मोदींचा इशारा
- कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घ्यायला हवा- पंतप्रधान मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
