Share

“ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा”, पंतप्रधान मोदींचा इशारा

Published On: 

मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी(१३ जाने.) पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी सध्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तद्पश्चात बोलत असतांना ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा, असा इशारा मोदींनी दिला आहे.

यावेळी बोलत असतांना मोदी म्हणाले आहे,’पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा ओमाक्रॉनचा प्रसार वेगाने होत असून आपले आरोग्य तज्ञ परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत. शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धचा भारताचा लढा आता तिसर्‍या वर्षात दाखल झाला आहे. कठोर परिश्रम हाच आमचा एकमेव मार्ग आहे आणि विजय हाच एकमेव पर्याय आहे. आम्ही १३० कोटी भारतीय आमच्या प्रयत्नांनी नक्कीच कोरोनावर विजय मिळवू.’ तसेच आपली तयारी कोविडच्या सर्व प्रकारांपेक्षा पुढे असली पाहिजे. आपण ओमायक्रॉनवर विजय मिळवल्यानंतर, आपल्याला व्हायरसच्या इतर प्रकारांशी लढण्यासाठी देखील तयारी करावी लागेल आणि यामध्ये राज्ये एकमेकांना सहकार्य करतील, असेही मोदी म्हणाले.

दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या बैठकीस गृहमंत्री अमित शाह(Amit Shah), केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया(Mansukh Mandvia), काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी(Charanjit Sing Channi), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत(Ashok Gehlot) आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल(Bhupesh Baghel), महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope)आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!