बंगळुरू: गेल्या काही दिवसांपासून भाजपनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. शरद पवार यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. बोम्मई यांच्या विनंतीवरून त्यांची भेट घेतल्याचं ट्विट पवार यांनी केलं आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पवारांच्या भाजप नेत्याशी सुरू असलेल्या भेटीगाठी मुळे चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बेंगळुरूमध्ये आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेतली. पवार यांनीच ट्विट करून ही माहिती दिली. मी आज बंगळुरूमध्ये होतो. त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा मला फोन आला. त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचं पद पाहता मी त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यांनी माझं चांगलं आदरतिथ्य केलं. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्य गेल्या अनेक वर्षापासून परस्पर सहकार्याने काम करत आले आहेत. त्यामुळे यापुढेही ही परंपरा कायम राहील अशी आशा आहे, असं पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्राविरुद्ध काँग्रेस इतर विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत असतानाच शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली. सहकार खाते आणि त्यातही सहकारी साखर कारखान्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगण्यात येत असले तरी दोन्ही दिग्गज नेत्यांमधील बैठकीनंतर झालेल्या १५ मिनिटांच्या गुप्त चर्चेवरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नागरी सहकारी बँकांच्या प्रश्नांवर चर्चा केली होती. काही दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमृता फडणवीस यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही, म्हणून त्यांनी ‘हे’ करावे’
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- प्रतिस्पर्धी ग्रेट ब्रिटनने वाढवले भारतीय महिला संघाचे मनोबल म्हणाले…
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

