मुंबई : उद्धव ठाकरेंकडे आम्ही तुमच्याकडे उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून काम करावं लागेल, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी काल मांडलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपकडून ठाकरे, राऊत आणि शिवसेनेला शालजोडीतून लगावले जात आहेत. अनेक नेते या संकल्पाची खिल्ली उडवताना पाहायला मिळत आहेत. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी एक लेख लिहिला असून शिवसेनेला काही खोचक प्रश्न विचारले आहेत.
पाहूया राम कुलकर्णी यांचा लेख –
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची वर्तमान राजकीय परिस्थितीत चलती, आणि बोलबाला आहे. मात्र संजय राऊतांना काल एक स्वप्न पडलं. ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या भारताचे पंतप्रधान मला दिसतात.? खरं म्हणजे राजकारणात किती स्तुतिपाठक व्हावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला. तरी ज्या संजय राऊतांना राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला. म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री करता आला. त्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांचे स्वप्न पंतप्रधान होण्याच आहे. ‘ त्यांच काय हा सवाल ? आता संजय राउताना पडलेल्या स्वप्ना नंतर राज्यातील लोकांना पडला आहे . जर उध्दव ठाकरे पंतप्रधान होणार असतील? तर मग आता पवारांनी बारामती च्या मळ्यात जाऊन बसावे कि काय असा प्रश्न पडतो , असं संजय उवाच यांच्या भाकीता वरून लक्षात येतं?
संजय राऊत यांचे वक्तव्य सतत वादात ,आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल असत . त्याचं कारण राजकारणात माणसं जेव्हा, स्तुतिपाठक बनतात. तेव्हा काय ?कधी ? बोलतील आणि स्वप्न पाहतील ? हे न सांगणे बरे .शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी, म्हणजे काल त्यांनी सांगितले की मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याचे पंतप्रधान दिसतात .? खरं म्हणजे जबाबदार राज्यकर्त्यांच्या वक्तव्याची चर्चा वेगवेगळ्या अनुषंगाने, आणि सतत राजकीय तर्क-वितर्क काढणारी असते .त्यामुळे ज्ञानी माणसं समजदारी बोलतात. नेहमीच राजकिय सावधानता आणि सजगता ठेवतात , पण राऊत या चौकोटीत बसत नाही . त्यांचा स्पष्टपणा केव्हा, काय कधी बोलेल ? हेच सांगता येत नाही .
आता बघा त्यांना स्वप्न पडलं ,म्हणे ठाकरे पंतप्रधान होणार ? या स्वप्नाला मुळात बेस कोणता ? हाच प्रश्न आहे. त्याचं कारण शिवसेनेचे जे खासदार निवडून आले. ते जवळपास पंचवीस खासदार केवळ नरेंद्र मोदीच्या लाटेमुळे निवडून आले. हे त्रिवार सत्य कोणीच नाकारू शकणार नाही .मात्र जणू काही ही ताकद आपलीच आहे , अशा प्रकारचा राजकीय आभास नंतर राऊतांना वाटणे सहाजिकच म्हणावे. पण देशाच्या इतर राज्यात कुठेही शिवसेना नाही . महाराष्ट्रात त्यांची राजकीय परिस्थिती त्यांना पण ज्ञात आहे .आणि मग स्वप्न तरी कसं पडलं ? हा प्रश्न आता जनतेला निश्चित पडला . या स्वप्नाची दुसरी बाजू लक्षात घेतली . तर निश्चित संजय रावतांनी एक प्रकारे, पंतप्रधानांन पदावर शिवसेनेचा दावा केला असच म्हणावे लागेल , त्यांचे स्वप्न कुठेतरी महा विकास अधाडी सोबत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याला निश्चित डिवचणारी म्हणावी लागेल.
त्याचं राजकीय कारण आणि इतिहास जनतेला चांगला माहीत आहे. गेल्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्रात राजकारण करणारे .राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार हे अनेक वर्षापासून दिल्लीच्या तखतावर बसण्याचे स्वप्न पाहून आहेत. एवढेच नाही तर . महाराष्ट्राचा मराठी माणूस पंतप्रधानपदी बसला .तर आम्हाला अभिमान ,आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊ ? अशा प्रकारची जाहीरपणे भुमीका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली होती. आज राजकीय परिस्थिती ती वेगळी असली तरी. पवार साहेब हे शिवसेनेच्या सोबत सत्तेत आहेत., एवढेच नव्हे त्यांनी पाठिंबा दिला म्हणूनच महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला. नाहीतर कदाचित शिवसेनेला अडगळीला पडावे लागले असते. यामुळे तरी किमान पंतप्रधान पदासाठी शिवसेना आपल्या सोबत राहील ? अशा प्रकारचा कदाचित आशावाद पवारांना असेल.
मात्र सत्तेत सोबत असताना, एकाच ताटात जेवत असताना पवारांच्या स्वप्नाचा भंग संजय राउतानी केला ? असच म्हणावे लागेल . कारण पंतप्रधानपदी बसण्याची पवार साहेबांची खूप इच्छा आहे ती केवळ त्यांनी बोलूनच नव्हे, तर देशाच्या राजकारणात अनेकदा प्रयत्नही केलेले आहेत. कदाचित हे सारं संजय राऊतांना माहित नाही, असं नाही.
पवारांच्या स्वप्नांचे ते साक्षीदार पण आहेत. मात्र महाराष्ट्राचे राजकारण आपण चालवतो ,? अशा अविर्भावात सध्यातरी संजय राऊत आहेत. त्यामुळे त्यांनी काल जे स्वप्न पाहिलं. त्या स्वप्ना त्यापेक्षा, अधिक पवारांच्या स्वप्नांचा भंग .संजय राऊत यांनी केला ? असं म्हटलं तर राजकारणात काय चुक ? किमान संजय राऊत यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर पंतप्रधान पदावर बसण्यासाठी .या वयात सुद्धा प्रयत्नशील असलेले शरदचंद्रजी पवार यांना काय वाटल असेल.
कालच्या घडामोडीनंतर बऱ्यापैकी तर्कवितर्कांना उधाण निश्चित आल आहे. तिसरी बाजू अशी आहे संजय राऊत यांनी पाहिलेले स्वप्न .साकार कसं होईल यापेक्षा, अधिक राजकीय स्तुतिपाठक. कशाप्रकारे राजकारणात आपली मांदीयाळी चालवतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे . राउतांचे त्यांचे स्वप्न होय.? आता राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते, खरं पाहिलं तर संजय यांना पडलेल्या स्वप्ना नंतर सावध होतील की काय ? आणि मग त्यावर त्यांचा राजकीय भरोसा राहणार की नाही, राहणार ? याच उत्तर आगामी काळात मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक मात्र निश्चित आहे हे सध्यातरी राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद चंद्रजी पवार साहेबांच्या स्वप्नांचा भंग ? त्यांच्याच सहकाऱ्यांकडून झाला, किंवा होतोय , असच म्हणावे लागेल .- राम कुलकर्णी (प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र)
कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची ‘ठाकरे सरकार’वर घणाघाती टीका
‘प्रत्येक माणसाचे उत्पन्न दुप्पट व्हावे हे माझे स्वप्न’
धक्कादायक : सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

