टीम महाराष्ट्र देशा : परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यात लढत होते आहे. या दृष्टीने दोनही नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दोनही नेते कार्यकर्त्यांचे मेळावे बैठका घेण्यात व्यस्त आहेत. तसेच मतदारांना वेगवेगळी आश्वासने देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण मेळावा हालगे गार्डन मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभेची निवडणूक ही भाजपाच्या सत्ता, पैसा आणि भावनिकते विरूध्द माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या विकासाची लढाई आहे अस विधान केले.
तसेच पुढे बोलताना मतदार संघातील प्रत्येक माणसाचे उत्पन्न दुप्पट व्हावे हे माझे स्वप्न आहे.२२ वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. या सेवेची मतरुपी आशीर्वादाने परतफेड करा असं आवाहन मतदारांना केले. तसेच जायकवाडीचे पाणी वाण धरणात आणणे, नवीन साठवण तलाव, थर्मल सुरू करणे, एम.आय.डी.सी. उभारणी या माध्यमातून प्रत्येक माणसाचा आर्थिक विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे असं धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान, राज्यातील बहुचर्चित लढतींपैकी एक लढत परळीमध्ये होत आहे. गेल्या १० वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पंकजा मुंडे करत आहेत. त्यांनी मागच्या दोनही वेळेस धनंजय मुंडेंचा पराभव केला होता.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176144201274122240?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176134338884206592?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176128710593765376?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

