Share

कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची ‘ठाकरे सरकार’वर घणाघाती टीका

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे सरकार कोरोना संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे, अशी टीका काँग्रेस नते संजय निरुपम यांनी केली आहे. संजय निरुपम यांनी सरकारची कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी अयशस्वी झाली असल्याचं ट्विट केलं आहे.

‘मुंबईमध्ये १,१८१ आयसीयू बेड उपलब्ध आहेत. १,१६७ बेडवर कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. फक्त १ टक्के बेडच शिल्लक आहेत. मुंबईमध्ये ५३० व्हॅन्टिलेटर्स आहेत, यापैकी ४९७ व्हॅन्टिलेटर्सचा वापर सुरू आहे. फक्त ६ टक्के व्हॅन्टिलेटर्स उरले आहेत. ही तयारी मागच्या ८० दिवसात झाली आहे. अजूनही कोरोनाचा उच्चांक यायचा बाकी आहे. म्हणूनच मुंबई हायकोर्टाने कडक आदेश दिले,’ असं ट्विट निरुपम यांनी केलं आहे.

संजय निरुपम यांनी आणखी एक ट्विट करून शिवसेनेवर टीका केली. ‘भ्रष्टाचारासाठी कुख्यात असलेल्या बीएमसीने कफनामध्येही दलाली खाल्ली. मृतदेह बांधण्यासाठी खरेदी केलेल्या बॅगमध्येही घोटाळा झाला आहे. ३०० रुपयांच्या बॅग ६ हजार रुपयांना खरेदी करण्यात आल्या आहेत. ३० वर्षांपासून शिवसेनेचं राज्य आहे आणि ते कोरोनाशी लढाई करत असल्याचा दावा करत आहेत’, अशी टीका निरुपम यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!