नवी दिल्ली : भारतात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाढत आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांना देखील याची कोरोनाची लागण होत आहे. नुकतेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या वहिनीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
सलून दुकानदारांना पारंपरिक व्यवसाय सोडून आता मोल मजूरी करण्याची वेळ
आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीच्या पत्नीचा आणि स्नेहाशीषच्या सासु-सासऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्या व्यतिरिक्त स्नेहाशीषच्या मोमीनपूरच्या घरी असणाऱ्या घरगुती मदतनीसास देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यांना दोन दिवसांपासून सर्दी, खोकला तसेच श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची देखील तपासणी करण्यात येणार आहे.
स्नेहशीष, जो स्वत: माजी रणजी क्रिकेटपटू आहे, याचीदेखील विषाणूची तपासणी करण्यात आली होती पण त्याचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पण तरी त्याला होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांना खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्नेहाशीष सध्या बंगालच्या क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले गांगुलीचे नातेवाईक गांगुलीच्या वडिलोपार्जित निवासात राहत नव्हते तर दुसऱ्या घरात राहत होते. शनिवारी पुन्हा त्यांची चाचणी होईल. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.
दरम्यान, जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव आता देशात झपाट्याने वाढतान दिसत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात करोनाचे तब्बल १४ हजार ५१६ नवे रुग्ण आढळून आले. तर, ३७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची संख्या आता तब्बल ३ लाख ९५ हजार ४८ वर पोहचली आहे.
देशभरातील एकूण करोनाबाधितांपैकी १ लाख ६८ हजार २६९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ लाख १३ हजार ८३१ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. तर आतापर्यंत देशात करोनामुळे एकूण १२ हजार ९४८ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.
अवैध बांधकामांवर पडला तुकाराम मुंढेंचा हातोडा; नागपुरात मनपाची मोठी कारवाई
दरम्यान, राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात शुक्रवारी (१९ जून ) १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६२ हजार ७७३ झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

