Share

संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या ; ‘महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी करा’ – उच्च न्यायालय

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुंबईतील एका महिला मानसोपचार तज्ज्ञाने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं प्रकरण आता राऊत यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत. कारण थेट कोर्टानं याची दखल घेतली असून मुंबई पोलीस आयुक्तांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच २४ जून रोजी याप्रकरणाचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

दरम्यान मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे कि, ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यानुसार तक्रारदार महिलेवर पाळत ठेवल्याच्या आरोपाप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी यात लक्ष घालून तक्रारीचं निवारण करावं आणि २४ जून रोजी यासंबंधिचा सद्य स्थितीचा अहवाल सादर करावा’, असं मुंबई हायकोर्टानं दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

काय आहेत ‘त्या’ महिलेचे आरोप :

‘संजय राऊत माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याचबरोबर आपल्या मागे माणसे लावणे, हेरगिरी करणे, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखविणे यासारख्या आरोपांसह विनयभंग केला आहे.’ असे आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर या महिलेने ‘२०१३ मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्या विषयी माहिम पोलिस ठाण्यात आणि सन २०१८मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता; मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी संजय राऊत यांचा साधा जबाबही नोंदवला नाही,’ असे या महिलेने त्यांच्या याचिकेत म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!