सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या चाकूहल्ल्यानंतर सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी (Sindhudurg District Police) भाजप आमदार नितेश राणे (Bjp Mla Nitesh Rane) यांची दोन वेळा चौकशी केली. तीसऱ्यांदा चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना समन्स बजावला असता ते हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मागावर पोलीस पथक पाठवण्यात आले असून तीन ठिकाणी पोलिसांनी फिल्डींग लावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
याप्रकरणी संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. आता नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी तीन ठिकाणी फिल्डींग लावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे.
नितेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून दिल्लीला जाऊ शकतात, त्यामुळे पोलिसांना गोवा विमानतळाशी संपर्क साधून फिल्डींग लावल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आज मुंबईत विधान भवनात नितेश राणे उपस्थित राहिले तर मुंबई पोलिसांच्या मदतीने नितेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ आता नितेश राणे यांनाही अटक होणार का? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नितेश राणे यांना काल तिसऱ्यांदा चौकशीसाठी कणकवली पोलिसांनी बोलावलं होतं. मात्र नितेश राणे चौकशीला हजर झाले नाहीत. त्यानंतर नितेश राणे यांच्या घरीही सिंधुदुर्ग पोलीस गेले. मात्र तिथेही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे नितेश राणे यांच्या चौकशीसाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी गोव्यातही फिल्डींग लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री वडेट्टीवारांकडून शिवाजी महाराजांचा अपमान; भाजपचा आरोप
- महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ‘त्या’ महाराजांविरोधात तक्रार दाखल
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
- नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन; पंतप्रधान मोदींची ट्वीट करत श्रद्धांजली
- दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन


