Share

Sanjay Raut । थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे ?, संजय राऊतांचा राज्यपालांना संतप्त सवाल

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut । मुंबई : महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. तसेच कोश्यारींच्या या वक्तव्यावर मनसे आणि राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत.

संजय राऊत यांनी ट्विटर वर चार ट्विट करत कोशारीच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राऊत ट्विटमध्ये म्हणाले कि, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे.. ऐका .. ऐका…, असं म्हणालेत.

दुसऱ्या ट्विटमध्ये राऊत म्हणाले कि, काय ती झाडी… काय तो डोंगर… काय नदी… आणि आता… काय हा मराठी माणूस… महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत, अशी टीकाही राऊत यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये केली आहे.

यानंतर पुढच्या ट्विटमध्ये थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे… 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता… मुख्यमंत्री शिंदे, ऐकताय ना? की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय?, असा सवालच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.

शेवटच्या ट्विटमध्ये आता तरी… ऊठ मराठ्या ऊठ… शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले? याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत. मराठ्या तुलाच उठावे लागेल, असं आव्हानच संजय राऊत यांनी मराठी माणसाला केलं आहे.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले होते ?

कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी राज्यपाल म्हणाले होते की, मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!