Share

NCP । महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

NCP । मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले होते ?

कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी राज्यपाल म्हणाले होते की, मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!