कराड : राज्यात मागील वर्षी ऐनवेळी राजकीय गणित बदलल्यामुळे झालेलं सत्तांतर पाहायला मिळालं. भाजप-शिवसेनेच्या महायुतीला २०१९ निवडणुकांमध्ये बहुमत मिळालं. मात्र, काही मतभेदांमुळे शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि विरोधी विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली.
या सरकारवर गेल्या वर्षभरात भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुरु ठेवलं असून हे सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत वर्तवलं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केला आहे. ‘सरकार पडणार आहे हे विरोधी पक्षांना सतत म्हणावंच लागतं.’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
‘105 आमदार असताना सरकार बनवता आलं नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे, म्हणून सारख्या काट्या पेटवतात’ अशी खोचक टीका अजित पवारांनी केली आहे. ‘आता महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाले आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. त्यांचे आशिर्वाद आहे, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही’ असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपात कामाची कदर नाही,राष्ट्रवादीत प्रवेश करुन मोकळा श्वास घेतोय : जयसिंगराव गायकवाड
- ‘मंदिर विषयावर शुद्र राजकारण करणं योग्य नाही,पण निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही’
- ‘गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जुन्या योजनांना केवळ स्थगिती देण्याचं काम केले’
- ‘मराठी माणसाने महाराष्ट्रात व्यापार उद्योग करणं, हा दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल’
- भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून प्रवेश केलेल्या गायकवाड यांचे पक्षात स्वागत- जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

