मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काल शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं. यानंतर, त्यांना आज दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं.
आमदार प्रताप सरनाईक यांना ईडी कार्यालयाने समन्स बजावले आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ते सकाळी ११ वाजता हजर राहणार असल्याचं वृत्त काही वाहिन्यांनी दिलं. त्यामुळे पिता-पुत्रांची एकत्र चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसं विनंती पत्र ईडीकडे सोपवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘१०५ आमदार असताना सरकार बनवता आलं नाही हे त्यांचं खरं दुखणं’
- ‘मंदिर विषयावर शुद्र राजकारण करणं योग्य नाही,पण निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही’
- ‘गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जुन्या योजनांना केवळ स्थगिती देण्याचं काम केले’
- ‘मराठी माणसाने महाराष्ट्रात व्यापार उद्योग करणं, हा दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल’
- भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून प्रवेश केलेल्या गायकवाड यांचे पक्षात स्वागत- जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

