रत्नागिरी – केंदीय मंत्री नारायण राणे यांची बहुचर्चित जन आशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा सुरु होणार आहे. नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी कोकण सज्ज झाले आहे. मुख्यतः कणकवली हा राणे परिवाराचा बालेकिल्ला आहे. कणकवलीत राणेंच्या होणाऱ्या स्वागताची सर्वांना उत्सुकता आहे.
जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरभर यात्रेच्या स्वागताचे आधीच फलक लागले आहेत. रात्री राणेंना जामीन मंजूर झाल्यानंतर मध्यरात्री शहरात गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. शहरात पटवर्धन चौकात रस्त्याच्या बाजूला रात्री गुढ्या उभ्या केल्या गेल्या. मुख्य चौकात आकाश कंदील लावले गेलेत. एकंदरितच कणकवलीतील राणेंचं स्वागत जंगी होणार आणि राणेसमर्थक जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान,जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका सुरुच ठेवल्यास शिवसेना यात्रेला विरोध करेल, असा इशारा आ. वैभव नाईक यांनी दिला. शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने राणे यांच्याकडून टीका होत असल्याने आम्ही विरोध करत आहोत. अटक झाल्यामुळे आता नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. ती सिंधुदुर्गाची परंपरा आहे. सुरेश प्रभू आणि मधू दंडवते यांनी यापूर्वी अशाप्रकारे राजीनामे दिले होते, याकडे वैभव नाईक यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
नाईक यांनी दिलेल्या या इशाऱ्यावर आता शिवसेनेनं जर जन-आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार, असा इशारा कोकण जन-आशीर्वाद यात्रेचे प्रमुख आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिलाय. त्यामुळे भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेवरुन पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निर्बंध शिथिल झाल्यानंतर मास्कचा वापरही झाला कमी, मास्क विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट
- ‘शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील ,तुम्ही मर्यादा ओलांडली तर..’, राऊतांचा इशारा
- ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले?’; वरुण सरदेसाईंचा प्रतिसवाल
- ‘आयुष्यात ‘पॉज’ बटण दाबू शकत नाही’; शिल्पा कठीण काळातही राहते आनंदी
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; राज्य सरकार ‘ती’ कागदपत्रे सीबीआयला देणार


