मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आता याप्रकरणात पुढील सुनावणी १९ तारखेला होणार आहे. तर दुसरीकडं, एनआयए सचिन वाझे यांची कसून चौकशी करत होती. यामुळे सचिन वाझे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
याप्रकरणी सचिन वाझे यांना आता अटक करण्यात आली आहे. रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल १३ तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी ११ वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास १३ तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली आहे. या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 14, 2021
संजय राऊत यांनी एक ट्विट करत म्ह्नात्ल आहे की, “लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वाला डाग लावू शकतात. पण तुम्ही केलेलं चांगल काम ते हिरावून घेऊ शकत नाही. तुमचं वर्णन त्यांनी कसंही केलं, तरी तुम्हाला ओळखणारे तुमचा आदर्श कायम ठेवतील,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘समांतर’ भाग दोन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस…
- पायाच्या दुखापतीनंतर ममता आज पुन्हा निवडणूक रणांगनावर
- गतवर्षीच्या निराशाजनक कामगिरीनंतर धोनीने घेतला संन्यास? भिक्खूच्या अवतारातला फोटो व्हायरल
- चौकशीनंतर सत्य बाहेर येईलच, वाझेंच्या अटकेनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
- ‘सत्य बाहेर आलं तर सरकार पडेल’; सचिन वाझेप्रकरणात कंगनाची उडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

