🕒 1 min read
चेन्नई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी नेहमी त्याच्या हेअर स्टाईलमुळे चर्चेत असतो. लांब केसांची त्याची स्टाईल एकेकाळी खूप लोकप्रिय होती. त्यानंतर त्याने केस कमी केले. आता त्याचा एक नवा फोटो समोर आला आहे, तो यापूर्वीपेक्षा पूर्ण वेगळा आहे. स्टार स्पोर्ट्स या आयपीएलच्या अधिकृत ब्रॉडकास्टरने हा फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
त्यामध्ये तो मुंडन करुन बौद्ध भिख्खूच्या कपड्यांमध्ये बसलेला दिसत आहे. हा फोटो थोड्याच वेळात सोशल मीडियावर Viral झाला आहे. गतवर्षीच्या निराशाजनक कामगिरीनंतर सीएसके संघ दमदार पुनरागमन करत चौथ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज होत आहे. अशात धोनीने संन्यास घेतला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

त्याचे झाले असे की, स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर धोनीचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये धोनी बौद्ध भिक्षूच्या अवतारात दिसत आहे. त्याने आपल्या डोक्यावरील पूर्ण केस कापले आहेत आणि बौद्ध भिक्षूंप्रमाणे पोशाखही धारण केला आहे. याबरोबरच एका जंगलात तो बसल्याचे दिसत आहे. या फोटोनंतर धोनीने संन्यास घेतला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
???????????? – our faces since we saw #MSDhoni's new avatar that could just break the Internet! ????What do you think is it about? pic.twitter.com/Mx27w3uqQh
— Star Sports (@StarSportsIndia) March 13, 2021
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात होण्यापुर्वी धोनीने संन्यास घेतल्याचे पाहून आयपीएलप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
-
‘सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा; होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी’
- ‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’, रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु
- सचिन वाझेंच्या अटकेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
-
टायगर अभी जिंदा है ; सिक्सरकिंग युवराजने केली षटकारांची बरसात
-
सचिनच्या अर्धशतकानंतर युवराजचा झंजावात; भारताच्या मालिकेतील सर्वोच्च धावांचा विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
