मुंबई : एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला अनुसरून एक थरारक कथा एम एक्स प्लेअरने समांतर या वेबसिरीज च्या रूपात प्रकाशित केली आहे. मराठी साहित्य हे किती समृद्ध आणि प्रयोगशील आहे, किती महत्वपूर्ण आहे तसेच ते महाराष्ट्र किंवा एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित राहू नये म्हणूनच समांतर ही मराठमोळी कथा अमराठी तसेच बहुसंख्य जगभरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचावी, तिला भाषेचे बंधन नसावं म्हणून मराठी व्यतिरिक्त इतर ३ भाषा म्हणजेच हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये ही वेबसिरीज प्रदर्शित करण्यात आली.
अभिनेता स्वप्नील जोशीच्या समांतर या वेबसीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समांतर वेबसीरिज प्रदर्शित होऊन आज एक वर्ष झाली आहेत. त्यानिमित्ताने स्वप्नील जोशीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय त्याने केक कट करत हा आनंद साजरा केला.
स्वप्नील जोशीने इंस्टाग्रामवर कॅमेऱ्याची स्क्रीन शेअर करत लिहिली की, लोकांच्या मनात स्थान मिळवलेली वेब मालिका म्हणजे समांतर १ ! कथा, पटकथा, लेखन, संवाद सादरीकरण आणि दिग्दर्शन व निर्मिती यांचा उत्तम योग साधत ही वेब सिरीज अगदी अल्प कालावधीत तुमच्या पसंतीस पडली. एक एक रहस्य उलगडत त्यातली गूढ गोष्ट तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही केलेला हा एक प्रयत्न होता.”
महत्त्वाच्या बातम्या
‘सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा; होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी’
- ‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’, रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु
- सचिन वाझेंच्या अटकेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
टायगर अभी जिंदा है ; सिक्सरकिंग युवराजने केली षटकारांची बरसात
सचिनच्या अर्धशतकानंतर युवराजचा झंजावात; भारताच्या मालिकेतील सर्वोच्च धावांचा विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

