कोलकाता: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.
दरम्यान बुधवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील निवडणूक रॅलीत काढण्यात आली होती. यावेळी भाजपने ‘तुम्ही आम्हाला परक्या आहात,’ अशी पोस्टर्स लावली आहेत. या प्रकारामुळे तृणमूलचे कार्यकर्ते संतापले होते. असे असताना ममता बनर्जी यांना दुखापत झाल्याने हे कारस्थान भाजपचे लोक करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. काही समाजकंटकांनी कारचा दरवाजा ढकलला त्यामुळे त्यांच्या पायाला जखम झाल्याने त्यांना ताबडतोब कोलकात्याला आणण्यात आले होते.
त्यानंतर आता ममता यांच्या पायाला झालेली दुखापत काहीशी बरी झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आज (दि. १४) त्या रॉड शो करणार आहेत. गांधी पुतळ्यापासून ते हजरापर्यंत ममता बॅनर्जी आज रोड शो करतील. हल्ल्यायानंतर ममता बॅनर्जींची ही पहिली सभा असणार आहे. ममता बॅनर्जींच्या डाव्या पायाला आणि खांद्याला मानेवर गंभीर दुखापत झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
‘सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा; होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी’
- ‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’, रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु
- सचिन वाझेंच्या अटकेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
टायगर अभी जिंदा है ; सिक्सरकिंग युवराजने केली षटकारांची बरसात
सचिनच्या अर्धशतकानंतर युवराजचा झंजावात; भारताच्या मालिकेतील सर्वोच्च धावांचा विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

