मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आता याप्रकरणात पुढील सुनावणी 19 तारखेला होणार आहे. तर दुसरीकडं, एनआयए सचिन वाझे यांची कसून चौकशी करत होती. यामुळे सचिन वाझे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
याप्रकरणी सचिन वाझे यांना आता अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली.
यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या जिलेटीनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओचा आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयए व एटीएसकडून सुरू आहे. त्यामुळे, चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, त्यानुसार आरोपींवर कारवाई होईल, असे स्पष्ट मत देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्य बाहेर आलं तर सरकार पडेल’; सचिन वाझेप्रकरणात कंगनाची उडी
- कोरोनाचे नियम तोडणे विखेंना भोवले ; गुन्हा दाखल करण्याचे आदेश
- सचिनच्या अर्धशतकानंतर युवराजचा झंजावात; भारताच्या मालिकेतील सर्वोच्च धावांचा विक्रम
- टायगर अभी जिंदा है ; सिक्सरकिंग युवराजने केली षटकारांची बरसात
- सचिन वाझेंच्या अटकेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…


