मुंबई : मुंबईतील कराची बेकरीच्या नावाला शिवसेनेच्या नितीन नांदगावकरांनी आक्षेप घेतला आहे. वांद्रे येथील कराची बेकरीचं नाव बदला, अशी मागणी नांदगावकरांनी केली आहे.कराची हे नाव पाकिस्तानमधील आहे आणि या नावामुळे आपल्या सैनिकांचा अपमान होतोय, असं सांगत कराची बेकरीचं नाव बदलण्याची मागणी नितीन नांदगावकरांनी केली होती.
मात्र, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून बेकरीचे नाव बदलण्याची भूमिका ही पक्षाची अधिकृत नसल्याचं म्हटलं आहे. ‘कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षापासून मुंबई सह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही.’ असा खुलासा संजय राऊत यांनी केला होता.
यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आपला ‘अखंड भारत’ या संकल्पनेवर पूर्ण विश्वास असून आम्हाला हा विश्वास आहे की एक दिवस कराची देखील भारतात असेल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत फडणवीसांना टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावरून फडणवीसांना ‘आधी पाकिस्ताननं बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीला आपण नंतर जाऊ,’ असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे. त्यामुळं आता ही शाब्दिक चकमक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा विद्यार्थ्यांनो EWS आरक्षण घेतल्यास SEBC आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही’
- ‘ही’ अट मान्य असेल तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
- पदवीधर व शिक्षक निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार पडणार – प्रवीण दरेकर
- मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही : मनसे
- शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका


