🕒 1 min read
मुंबई- पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले. ते समाजमाध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना केले.
महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. दिवाळीनंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे पण तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही, दुसरी तिसरी लाट येऊ शकते. कृपा करून सगळं सुरू केलं म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही हे लक्षात घ्या असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 23, 2020
मुख्यमंत्र्यांनी साधलेल्या संवादावर मनसेने टीकास्त्र सोडलं आहे.बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दात टीका केली.
महत्वाच्या बातम्या
- शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू : हसन मुश्रीफ
- ‘ही’ अट मान्य असेल तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
- कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : उद्धव ठाकरे
- ‘ज्या राज्याचा मुख्यमंत्री घरीच बसून असतो, ते राज्य नेहमीच धोक्याच्या वळणावर असते’
- शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
