मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजातील युवकांना आर्थिक मागास प्रवर्गातील EWS आरक्षण स्वीकारु नये, असं आवाहन केलं आहे. खासदार संभाजीराजे यांनी यापूर्वी देखील राज्य सरकारकडे मराठा समाजाला EWS मधून आरक्षण नको, अशी भूमिका मांडली होती. EWS आरक्षण स्वीकारल्यास SEBC च्या आरक्षणाला अडचण निर्माण होईल, असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं आहे.
मराठा विद्यार्थ्यांनो EWS आरक्षण घेतल्यास SEBC आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS आरक्षणाचा लाभ घेण्यास मान्यता दिली होती.
… pic.twitter.com/I43rATreHN— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 22, 2020
याबाबत खा. संभाजीराजे यांनी लिहिलेली सोशल मिडीयावरील पोस्ट
मराठा विद्यार्थ्यांनो EWS आरक्षण घेतल्यास SEBC आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. ..काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS आरक्षणाचा लाभ घेण्यास मान्यता दिली होती. नुकतंच उच्च न्यायालयानेदेखील मराठा समाजातील एका विद्यार्थ्यास EWS कोट्यातून शैक्षणिक प्रवेश घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र या दोन्ही न्यायालयांनी असा निकाल देत असताना स्पष्टपणे नोंदवले आहे की, जे विद्यार्थी EWS कोट्यातून प्रवेश घेतील त्यांना SEBC आरक्षणाचे कोणतेही लाभ घेता येणार नाहीत.
मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर काहींनी EWS आरक्षणचा पर्याय सुचविला होता , मात्र तेव्हापासून समाजाला माझे हेच सांगणे आहे की मराठा आरक्षण रद्द झाले नसून केवळ स्थगिती दिलेली आहे. मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास म्हणून सिद्ध केले असताना आपण EWS कोट्यातून आरक्षण घेतल्यास त्याचा SEBC आरक्षणाच्या कायदेशीर लढाईवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. EWS चा लाभ घेतल्यास SEBC आरक्षणाला धोका पोहोचू शकतो, हे मी पूर्वीपासून सांगत आहे. यासाठी EWS आरक्षणाचा लाभ घेताना SEBC च्या आरक्षणावर कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याची हमी राज्य सरकारने घ्यावी.
उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या या निर्णयांमुळे माझी भूमिका स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे. शिवाय EWS चे १०% आरक्षण हे केवळ मराठा समाजासाठी नसून आर्थिकदृष्ट्या मागास खुल्या वर्गात असणाऱ्या सर्व समाजघटकांसाठी आहे, हेदेखील लक्षात घ्यावे.
महत्वाच्या बातम्या
- शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू : हसन मुश्रीफ
- ‘ही’ अट मान्य असेल तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
- पदवीधर व शिक्षक निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार पडणार – प्रवीण दरेकर
- मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही : मनसे
- शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

