🕒 1 min read
मुंबई: राजकीय लढाया निवडणुकीच्या आखाडय़ात लढायच्या असतात. हीच या देशाची परंपरा आहे. आज राजकीय लढाया कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहोचल्या. राहुल गांधी यांना छळायचे व आम्ही त्यांचा छळ करू शकतो याचे प्रदर्शन घडवायचे, विरोधात उठलेला प्रत्येक श्वास बंद करायचा हीच नवी लोकशाही उदयास आली आहे. बुलडोझर फक्त घरांवरच फिरतो असे नाही, तो व्यक्तीच्या नागरी अधिकारांवर आणि देशाच्या स्वातंत्र्यावरही फिरताना स्पष्ट दिसत आहे. आज राहुल गांधी, उद्या सोनिया गांधी, त्यानंतर आणखी कोणी! विरोधकांना खतम करण्यासाठी हिटलरने ‘ज्यू’च्या कत्तली केल्या तसे ‘विषारी गॅस चेंबर्स’ निर्माण करणे तेवढेच बाकी आहे. राजकीय सूडाची पावले त्याच दिशेने पडत आहेत. देशात कायद्याचे राज्यच राहिले नाही, तेथे ‘कायदा सर्वांसाठी समान’ या बोलण्यास काय अर्थ? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केला आहे.
देशाचा राजकीय मौसम बदलला नाही तर आपण सगळेच कायमचे अंधाऱ्या गुहेत ढकलले जाऊ असेच वातावरण निर्माण झाले आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी साडेआठ तास चौकशी झाली. ‘नॅशनल हेराल्ड’ हे स्वातंत्र्य संग्रामात लढणारे वृत्तपत्र होते. पंडित नेहरूंनी या वृत्तपत्राची स्थापना केली. हे वृत्तपत्र आर्थिक संकटात सापडले, तेव्हा कॉंग्रेसने ‘कर्ज’ देऊन ही संस्था वाचवली. हे सर्व प्रकरण मनी लॉण्डरिंगच आहे असे ‘ईडी’ने ठरवले व राहुल तसेच सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले.
सोनिया गांधी या कोविडमुळे इस्पितळात दाखल आहेत, राहुल गांधी ‘ईडी’समोर हजेरी लावत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे सर्व नेते व असंख्य कार्यकर्ते दिल्लीच्या रस्त्यावर उतरून निषेध करीत आहेत. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसचा सत्याग्रह हा तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. “कायद्याच्या वर कोणी नाही, कायद्यापुढे सर्व समान आहेत.” असेही सौ. इराणी म्हणतात ते खरेच आहे, पण भाजपपुढे कायदा आज खुजा झालेला दिसतोय. शिवसेना, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांच्याच मागे ‘ईडी’ वगैरेचा ससेमिरा लागलेला आहे. हे लोक त्यांच्या घराघरात घुसतात, तसे कुण्या भाजपवाल्यांच्या घरात घुसल्याचे कधी दिसले नाही. अलीकडेच जे ‘आयपीएल’चे सामने पार पाडले, त्यात पुढे व मागे जे आर्थिक व्यवहार पार पडले, त्यात मोठया उलाढालीमागे कोण होते, हा ‘ईडी’ सारख्या संस्थासाठी संशधनाचा विषय आहे. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मोठी बातमी! आयर्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूला बनवलं कॅप्टन!
- पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट; चाहते म्हणतायत…!
- IND vs SA : सामना जिंकूनही ऋषभ पंतने खेळाडूंवर केली नाराजी व्यक्त; म्हणाला…!
- ENG vs IND : इंग्लंड दौऱ्यावर जाण्याअगोदर केएल राहुलची होणार ‘अग्निपरीक्षा’; वाचा!
- “ही फक्त सुरुवात…” ; विरोधी नेत्यांच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
