Share

Sanjay Raut : ‘त्या’ दिलाशाचे लाभार्थी कोण ते भविष्यात उघड होईलच; संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेच्या स्थापनेनंतर राजकारणात २८० सेना निर्माण झाल्या. अमुक सेना किंवा तमुक सेना वगैरे, पण गेली ५६ वर्षे टिकली ती फक्त शिवसेनाच! गुवाहाटीमध्ये ‘डोंगर, झाडी, नदी, हाटील’ची मजा घेत जे आमदार बसले आहेत, त्यांना शिवसेनेच्या या चमत्काराची जाणीव नसेल असे कसे मानायचे? आता कोर्टबाजी सुरू झाली आहे व ‘हाटील, डोंगर, झाडी’त बसलेल्या आमदारांवर ११ तारखेपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. हा एक प्रकारे ‘दिलासा’च आहे. त्या दिलाशाचे लाभार्थी कोण ते भविष्यात उघड होईलच,” असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी झाडीत बसलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे सर्वोच्च न्यायालय म्हणते. म्हणजे विधानसभेचे अधिवेशन ११ जुलैनंतरच घेता येईल. तोपर्यंत आमदारांना ‘डोंगर-झाडी-हाटील’मध्येच राहावे लागेल. या सगळ्या परिस्थितीत भाजपा नक्की कोठे आहे? भाजपा म्हटलं तर सर्वत्रच आहे, पण कुठेच नाही! त्यांचे काम नारदमुनीप्रमाणे चालते. सुधीर मुनगुंटीवारांसारखे नेते विजयाची दोन बोटे नाचवत आपल्या गाडीतून फिरत आहेत. भाजपा आपल्या मित्रांचा, सहकारी पक्षांचा ‘घास’ गिळूनच शांत होतो हे आता झाडीतल्या आमदारांना व नेत्यांना लवकरच कळेल. या आमदारांच्या गटास महाशक्तीचा अजगरी विळखा पडला आहे. हा अजगर अख्खा बोकड गिळावा तसे या गटास गिळून पुढे जाईल,” असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निकालानंतर झाडी-डोंगरातील आमदारांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली- “हा बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे!’’ शाब्बास पठ्ठ्या! आनंद दिघे हे एक निष्ठावान, कडवे शिवसैनिक होते व बाळासाहेबांचा विचार हाच त्यांचा श्वास व ध्यास होता. जीवनभर त्यांनी कोणत्याही पदाची आस धरली नाही. रंजल्या-गांजल्यांचे ते वाली होते. त्यामुळे त्यांच्या कोणत्या विचारांचा विजय झाला? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!