मुंबई : मागील आठवड्यात मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thakray) एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली होती. तद्पश्चा आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी ठाकरेंच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
यासंदर्भात माहिती देत राऊत म्हणाले की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात आहेत. त्यांची तब्येत सुधारत आहे. काल रात्री माझी आणि त्यांची फोनवरुन चर्चा झाली. लवकरच ते घरी जातील. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आहेत त्यामुळे त्यांनी संपूर्ण बरे झाल्यानंतर कामाला लागावे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु नये. कारण ज्या प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे कुठेतरी लहान गोष्टीमध्ये कमतरता राहिली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.’
दरम्यान, रुग्णालयात दाखल होण्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले होते. यात ते म्हणाले होते की,’गेल्या सुमारे दोन वर्षांपासून करोनाचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. त्यामुळे या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.’
महत्वाच्या बातम्या:
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
- भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी- बाळासाहेब थोरात
- गेहलोत मंत्रिमंडळात फेरबदल; १५ मंत्री घेणार शपथ
- कोणाच्या अंगी देव येतो, निघून जातो, पण बाबासाहेबांच्या अंगी…- संजय राऊत
- मुख्यमंत्र्यांची घोषणा; आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना करणार मोठी मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

