मुंबई : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 6 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची पूर्णपणे तयारी केली आहे.
बेळगाव महानगरपालिकेसाठी आज तब्बल आठ वर्षानंतर मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संपूर्ण कर्नाटक राज्याच आणि पश्चिम महाराष्ट्राच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे उतरले आहेत. त्यांच्यासमोर महाराष्ट्र एकीकरण समितीचे तगडे आव्हान आहे. मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीमुळे स्थानिक मराठी भाषिकांसाठी ही अस्मितेची लढाई बनली आहे.
याबाबत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत बेळगाव पालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकणार, असा दावा केला आहे. बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसं उत्साही वातावरण दिसतंय. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे. हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे,’ असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंदाज घेणार, गर्दी वाढल्यास दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेणार’
- अश्विनला पुन्हा ठेवलं बाहेर; पत्नीनं व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली नाराजी
- ‘दिल्ली विधानसभेत सापडला लाल किल्ल्यापर्यंत पोहोचणारा ब्रिटिशकालीन बोगदा’
- कुठे चिखल तुडवत, तर कुठे बैलगाडीतून धनंजय मुंडे नुकसानग्रस्तांच्या बांधावर
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’


