इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना लंडनच्या केनिंगसन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. इशांत शर्माच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला, तर मोहम्मद शामीच्या जागी ठाकूरला संघात स्थान मिळाले आहे. मात्र यावेळीही अश्विनला संघात स्थान मिळालेले नाही.
अश्विनला या सीरिजमध्ये एकदाही प्लेईंग 11 संधी मिळाली नसल्याने. अश्विनची पत्नी प्रिती नारायण हिनं नाराजी व्यक्त केली आहे. अश्विनची पत्नी प्रिती सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. यावेळी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्विनला संधी मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
https://twitter.com/prithinarayanan/status/1433408585074200587?s=20
प्रितीनं तिची मुलगी दुर्बिनीतून मॅच पाहत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमधून तिनं ही नाराजी व्यक्त केली आहे. ‘रविचंद्रन अश्विनला पाहत आहे.’ अशा आशयाचं कॅप्शन तिनं या व्हिडीओला दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी! ‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना ‘दे धक्का!’
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’


