नवी दिल्ली: विधानसभेत गुरुवारी लाल किल्ल्यापर्यंत पोहोचणारा ब्रिटिशकालीन बोगदा सापडला आहे. अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल यांनी दिली आहे. त्याकाळी ब्रिटिशांनी स्वातंत्र्य सैनिकांना हलवताना त्याचा वापर केला होता. अशी माहिती राम निवास गोयल यांनी दिली आहे.
तसेच त्यांनी याबाबत अजून माहिती दिली आहे. जेव्हा मी १९९३ साली आमदार झालो त्यावेळी लाल किल्ल्यापर्यंत जाणाऱ्या एका बोगद्याबद्दल ऐकले जात होते आणि मी त्याचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर स्पष्ट अशी माहिती नव्हती, असेही ते म्हणाले आहेत.
https://twitter.com/ANI/status/1433553392979173378
मात्र या बोगद्याच्या शेवट पर्यंत पोहचणे कठीण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कारण मेट्रो प्रकल्प आणि सीवर इंस्टॉलेशनमुळे बोगद्याचे सर्व मार्ग नष्ट झाले आहेत. दरम्यान ब्रिटीशकाळी १९१२ साली कोलकाताहून दिल्लीला राजधानी हलवल्यानंतर १९२६ साली दिल्ली विधानसभेचे रुपांतर न्यायालयात करण्यात आले होते. या बोगद्याचा वापर स्वातंत्र्य सैनिकांना न्यायालयात नेण्यासाठी केला जात असत.
याठिकाणी फाशीच्या खोलीला स्वातंत्र्य सैनिकांच्या श्रद्धांजली म्हणून बदलण्याचा आमचा हेतू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात या ठिकाणाला खूप समृद्ध इतिहास आहे. त्यामुळे पर्यटकांना इतिहासाबद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी या भागाचे नूतनीकरण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागातील पाणी प्रश्न मिटणार, मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

