Share

‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’

Published On: 

पुणे – राज्य सहकारी बँकेशी संबधित एकूण 7 ठिकाणी ED कडून धाडी टाकल्या असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज्य सहकारी बँकेवर EDची छापेमारी अशी बातमी मीडियात चालली. मात्र अशी कुठलीही घटना घडली नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले, या सर्व धादांत खोट्या बातम्या आहेत, मात्र मी कायदेशीर कारवाई करणार नाही. मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास उडत चालला आहे. काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो. मी 40 वर्षे राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले.

सहकारामुळे राज्यात बदल आणि विकासदेखील झाला आहे. पण याच सहकाराला नावदेखील ठेवण्याचे काम केलं गेलं आहे. काही जणांनी चुकीचे काम केले असेल तर संपूर्ण सहकार क्षेत्र चुकीचे आहे असं होत नसल्याचं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!