Share

‘संजय राऊत ऑफिसमध्ये बसून टीका, राजकारण करणारे कागदावरचे नेते’ फडणवीसांचा टोला

Published On: 

लातूर: राज्यातील अनेक भागात विशेषत: मराठवाड्यात झालेल्या पावसामुळं शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. यानंतर राजकीय नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर सामना अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे.

मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का? फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौराही अखेर ‘व्हाया ओला दुष्काळ’ राजकारण, असाच झाला म्हणायचा, अशी टीका शिवसेनेनं केली आहे. तर यावरच आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘जे ऑफिसमध्ये बसून टीका, राजकारण करतात त्यांना शेतकऱ्यांची परिस्थिती समजूच शकत नाही. त्यांनी कधी शेतकऱ्यांना जाऊन भेट दिली नाही, त्यांचे अश्रू पुसले नाहीत. येथे येऊन अश्रू पाहिले असते तर असं बोलायची त्यांची हिंम्मतच झाली नसती. त्यामुळे अशा लोकांना का उत्तर द्यायचं? हे कागदावरचे नेते आहेत. हे अग्रलेख लिहून नेते झालेले लोक आहेत त्यामुळे त्यांना काही मी उत्तर देत नाही’ अशी खोचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!