Share

स्विस बँकांमध्ये भारतीयांची २० हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम?; केंद्र सरकारने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Published On: 

नवी दिल्ली- स्विस बँकांमधील भारतीयांच्या ठेवीत वाढ झाली असल्याचे वृत्त ह समोर आल्यानंतर काल एकच खळबळ उडाली. 2019 अखेरच्या 6,625 कोटी रुपयांच्या (CHF 899 दशलक्ष) तुलनेत 2020 अखेर 20,700 कोटी रुपये (CHF 2.55 अब्ज ) इतकी झाली आहे. त्याआधी 2 वर्षे यात घसरण झाली होती. गेल्या 13 वर्षातील या सर्वाधिक ठेवी असल्याचे ; काल माध्यमांमध्ये प्रकाशित वृत्तांमध्ये नमूद केले आहे.

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बॅंकांनी स्विस नॅशनल बँकेकडे (एसएनबी) नोंदवलेली ही अधिकृत आकडेवारी असून स्वित्झर्लंडमध्ये जमा केलेला कथित काळा पैसा किती आहे हे यात दाखवलेले नाही या तथ्याचाही माध्यमांनी आडवळणाने उल्लेख केला आहे. शिवाय, या आकडेवारीत भारतीय, अनिवासी भारतीय किंवा इतरांनी स्विस बँकांमध्ये  तिसऱ्या  देशातील कंपनीच्या नावे जमा केलेल्या पैशाचा समावेश केलेला नाही.मात्र , ग्राहकांच्या ठेवीत 2019 अखेरपासून खरोखरच घट झाली आहे.

2019 अखेरपासून विश्वस्तांच्या मार्फत जमा ठेवीही निम्म्यापेक्षा जास्त आहेत. सर्वात मोठी वाढ “ग्राहकांकडून थकित अन्य रक्कम ” मध्ये झाली आहे. ही रोखे, सिक्युरिटीज आणि इतर अनेक वित्तीय साधनांच्या स्वरूपात आहेत असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

भारत आणि स्वित्झर्लंडने कर आकारणीच्या बाबींवर परस्पर प्रशासकीय सहाय्य (एमएएसी) वर  स्वाक्षऱ्या  केल्या आहेत आणि दोन्ही देशांनी बहुपक्षीय सक्षम प्राधिकरण करारावर (एमसीएए) देखील स्वाक्षरी केली आहे, त्यानुसार 2018 नंतर दरवर्षी वित्तीय खात्याची माहिती सामायिक करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये स्वयंचलित माहिती आदानप्रदान (एईओआयआय) व्यवस्था कार्यान्वित केली आहे.

वर्ष 2019 आणि 2020 मध्ये दोन्ही देशांमधील रहिवाशांच्या संदर्भात वित्तीय खात्याच्या माहितीचे आदानप्रदान झाले आहे. वित्तीय खात्याच्या माहितीचे आदानप्रदान करण्याबाबत सध्या अस्तित्वात असलेली व्यवस्था लक्षात घेता भारतीय रहिवाशांच्या अघोषित उत्पन्नामधून स्विस बँकांमध्ये ठेवी वाढण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही असे सरकारने सांगितले आहे. दरम्यान,अर्थ मंत्रालयाने स्विस बँकांमधील ठेवींमधील वाढ किंवा घट याची पडताळणी करण्यासाठी स्विस अधिकाऱ्यांकडून काही माहिती देखील मागविण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!