Share

Sanjay Raut : पत्रकार परिषदेत शिवसैनिकांचे कोणतेही शक्तीप्रदर्शन नाही; संजय राऊत काय बोलणार याकडे लक्ष

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  थोड्याच वेळात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची शिवसेना भवनात दुसरी पत्रकार परिषद सुरू होणार आहे. यावेळी ते काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र यावेळी शिवसैनिकांचे कोणतेही शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले नाही. त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन केले होते.

दरम्यान  केंद्रीय तपास यंत्रणा केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. आजच्या परिषदेत भाजप नेते, ईडीच्या भ्रष्टाचाराचे मुखवटे फाडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान काही तासांपूर्वी राऊत यांनी एक ट्वीट केले आहे. “तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा, हमें बदनाम करते फिर रहे हो अपनी महफ़िल में…अगर हम सच बताने पर उतर आएं तो क्या होगा..? आज चार वाजता, शिवसेना भवन”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड होणार आहे. इडीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुरावे पाठविले असून ही सर्व माहिती पत्रात आहे आणि टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आज त्यातला पहिला भाग मी बाहेर काढणार आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!