Share

बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं, अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. एका बाजूला भाजप आणि शिवसेना जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी नतमस्तक होऊन शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ केला. यानंतर झालेल्या जुन्नर येथील सभेत अमोल कोल्हे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेची खिल्ली उडवत टीका केली. काही लोक संवाद यात्रेच्या निमित्ताने शेतात जात आहेत. मात्र त्यांची अवस्था, ‘बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं’ अशी झाली असल्याचे सांगत असताना आदित्य ठाकरे यांना नाव घेता टोला लगावला आहे.

पुढे बोलताना कोल्हे यांनी मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेच्या आधी यवतमाळ जिल्ह्यातील मनिषा काटे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीला तिच्या एक वर्षाच्या बाळासहीत स्थानबद्ध करावे लागले, ठिकठिकाणी यात्रेला काळे झेंडे दाखवले गेले यातूनच मुख्यमंत्र्यांची यात्रा किती फोल आहे अस म्हणत अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका केली आहे.

दरम्यान, लातूरमध्ये युवायेना नेते आदित्य ठाकरे यांनी शेतीप्रश्न समजून घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. शेतकऱ्यांसोबत त्यांनी शेतात काम करण्याचा अनुभवदेखील घेतला होता. लातूरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून निघाल्यानंतर आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांसोबत पेरणी करत सध्याच्या पेरणीची स्थिती आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या होत्या.

#Article370 : आज खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला : उद्धव ठाकरे

#Article370 : लहू था जो लाल मेरा,अब वो है तिरंगे की लहर

मोदी है तो मुमकिन है : तेव्हा लाल चौकात झेंडा फडकवला अटक झाली, आता १५ ऑगस्टला तिरंगाच फडकणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!