Share

काश्मीरच्या मुद्द्यावरून काका-पुतणे आमने सामने, अजित पवारांनी केलं विधेयकाचं स्वागत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची शिफारस आज राज्यसभेत केली. सरकारकडून करण्यात आलेल्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता देशाच्या स्वातंत्र्यापासून काश्मीरला देण्यात आलेला विशेषाधिकार संपणार आहे. सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे, मात्र दुसरीकडे विरोधकांनी सरकार मनमानी करत असल्याचा आरोप केला आहे.

पवार चुलता आणि पुतण्यामधील एकाच विषयावर असलेली वेगवेगळी मतं यापूर्वीही समोर आली होती. आता पुन्हा एकदा ३७० कलमावर काका पुतण्यामधील संभ्रम समोर आला आहे. एकीकडे शरद पवार या विधेयकाला विरोध करत असताना अजित पवारांनी मात्र या विधेयकाचं स्वागत केलं आहे.

आझाद काश्मीरची भूमिका मांडणारे काही लोक तिथे होते, मात्र मेहबूबा मुफ्ती, गुलाबनबी आझाद, फारूक अब्दुल्ला यांच्या सारखे भारताशी निष्ठा असणारे काही लोक काश्मीरात आहेत. हे सर्वजण अतिरेकी भूमिका घेणाऱ्यां विरोधात भारताची भूमिका अखंडपणे मांडत आले आहेत, मात्र भारतासोबत निष्ठा असणाऱ्या लोकांना बाजूला ठेवून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगत सरकारवर तोफ डागली होती.

मात्र काश्मीर प्रश्नाच्या मुद्द्यावरून पवार कुटुंबियांमध्ये मतभेद आहेत कि काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. हा सवाल उपस्थित होण्यामागे शरद पवारांचे पुतणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. या ट्वीटमध्ये अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरुद्ध भूमिका मांडली आहे.

सरकारनं ३७० कलम रद्दबातल करून चांगला आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. १८ पगड जातीचे लोक एकत्र राहावेत, देश एकसंघ राहावा म्हणून असे निर्णय घेणं गरजेचं आहे असं पवार यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे . तसेच आता पुढे खबरदारी बाळगून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या; देशभरातली जनता पाठीशी उभी राहील. यात राजकारण नको असं देखील म्हटलं आहे.

दरम्यान,सरकारच्या या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय !’ अशा शब्दात सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज ठाकरे यांच्यासोबत अनेक पक्षांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. यात एआयएडीएमके, लोजपा, आरपीआय, अकाली दल, शिवसेना, वायएसआरसीपी, टीआरएस, बीजेडी, टीडीपी, आम आदमी पार्टी आणि बसपा यांचा समावेश आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!