मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असणारा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा आता सुरु झाला आहे. अमित शहा हे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. यंदाच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सत्तांतरानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. तर मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुशंगाने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आता या दौऱ्यात अमित शहा कोणकोणत्या गोष्टी करणार, शहांच्या दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात कोणते बदल होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सत्तांतराचा पेच अजूनही कायम असून, या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यात आगामी काळात राज्यातील मुंबईसह राज्यातील प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुकांच बिगुल वाजणार आहे. त्याआधीच विजयाची पताका उंचवण्यासाठी भाजपने हालचाली करण्यास सुरूवात केली केल्यात. त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
अमित शाह हे मुंबईत दाखल झाले असून सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर पोलिस बंदोबस्त हा वाढवण्यात आला आहे. सोमवारी सकाळी 10 ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते वांद्रे येथील सार्वजनिक गणेश उत्सवाच्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. गणरायाचे दर्शन झाल्यानंतर 11 च्या सुमारास भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; दानवेंचं गायकवाडांना प्रत्युत्तर
- IND vs PAK । “बाबर आझमने या क्रमांकावर फलंदाजी केली, तर भारताविरुद्ध… “; सामन्यापूर्वीच माजी खेळाडूच मोठे विधान
- Cyrus Mistry Death । टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा पालघरमधील रस्ते अपघातात मृत्यू
- Jayant Patil | “दसरा मेळावा ही परंपरा उद्धव ठाकरेच…”; पाटलांचा मोठा दावा
- IND vs PAK । रोहित शर्मा पुन्हा पुन्हा का फ्लॉप होतोय? या दिग्गज खेळाडूने केला मोठा खुलासा

