🕒 1 min read
बीड : शनिवारी बुलढाण्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये मोठा राडा झाला असल्याचं पाहायला मिळालं. चक्क हा सगळा प्रकार पोलिसांसमोरच झाला असल्याचं समजतं आहे. या प्रकारावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना पक्षातील नेत्यांना चांगलंच धमकावलं. तर यानंतर गायकवाड यांच्या टीकेला आता शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
दानवे यांनी गायकवाड यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले कि, शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचा आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. तसेच पुढे दानवे म्हणाले संजय गायकवाड यांच्यात हिंमत असेल तर भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर यावे. मग कळेल कोण चुन चुन के मारेल आणि कोण गिन गिन के मारेल, असा इशारा त्यांनी गायकवाड यांना दिला आहे.
संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले होते?
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलाल, तर चून चून के, गिन गन के मारे मायेंगे, असं म्हणत संजय गायकवाड यांनी शिवसेना नेत्यांना ठणकावलं आहे. संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
शिंदे गट आणि ठाकरे गटात नेमका वाद काय झाला ?
बुलढाण्यामध्ये शनिवारी ठाकरे गटाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी आमच्या नेत्यांवर टीका का करता?, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. त्याठिकाणी कुणाल गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि खासदार प्रतापराव जाधव या दोघंही गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांवरील जबाबदारी काढून घेत त्यांच्याजागी बुलढाण्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची नव्याने नेमणूक केली होती. त्यामुळे बुलढाणामधील राजकीय वातावरण तापलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs PAK । “बाबर आझमने या क्रमांकावर फलंदाजी केली, तर भारताविरुद्ध… “; सामन्यापूर्वीच माजी खेळाडूच मोठे विधान
- Cyrus Mistry Death । टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा पालघरमधील रस्ते अपघातात मृत्यू
- Jayant Patil | “दसरा मेळावा ही परंपरा उद्धव ठाकरेच…”; पाटलांचा मोठा दावा
- IND vs PAK । रोहित शर्मा पुन्हा पुन्हा का फ्लॉप होतोय? या दिग्गज खेळाडूने केला मोठा खुलासा
- Nilesh Lanke | रस्त्यात बंद पडलेल्या एसटीला निलेश लंकेचा ‘दे धक्का’…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
