Share

Cyrus Mistry Death । टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा पालघरमधील रस्ते अपघातात मृत्यू

Published On: 

मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या निधन बातमीमुळे  मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांकडून सायरस मिस्त्री गुजरातवरून मुंबईच्या दिशेने येत असतांना चोरोटी येथे त्यांच्या गाडीचा अपघाच झाला असल्याचं समजलं आहे.

सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन-

सायरस मिस्त्री पालघरमधील डहाणू तालूक्यातील चारोटी या गावातील चारोटी नाक्यावर त्यांची चारचाकी दुभाजकाला धडकली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबतची सर्व माहिती पोलीस आधिकाऱ्यांनी दिली. सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पल्लोनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. 2006 साली मिस्त्री टाटा समुहाचे सदस्य बनले होते. तर 2013 साली वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते.

2006 साली टाटा समूहाच्या अध्यपदी विराजमान झाले-

परंतू 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा समूहाच्या बोर्ड सदस्यांनी सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून काढण्यात आले आणि त्याजागी टाटा समूहाच्या बोर्ड सदस्यांनी रतन टाटा यांना पुन्हा एकदा अध्यक्ष बनवले. मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यामागचे कोणतेही अधिकृत कारण समोर आलेले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री अध्यक्ष झाल्यानंतर टाटा समूहाचे कोणताही निर्णय मंडळाच्या सदस्यांशी सल्लामसलत न करता घेत असल्याचं बोललं जात आहे.

त्याचप्रमाणे मिस्त्री यांचा जन्म मुंबईत पारसी कुंटुंबात झाला असून, पल्लोनजी मिस्त्रींचे ते धाकटे सुपूत्र होते. लंडन बिझनेस स्कूलमध्ये त्यांच शिक्षण झाल तर लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण झालं केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!