मुंबई: सामान्य लोकांच्या भावना महापुरुषांशी जोडलेल्या असतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले असे अनेक युग पुरुष आहेत ज्यांच्याशी अनेकांच्या भावनिक नाते जडलेले असते. त्यांच्या विषयी लिहतान सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वक्तव्यं केलं आहे.
नाशिकमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दैनिक लोकसत्ताचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) लिहिलेल्या पुस्तकावर आक्षेप घेत शाईफेक करण्यात आली. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला होता.
या प्रकरणावर बोलताना शिवसेना खसदसार संजय राऊत म्हणाले, आपण कितीही हुशार असलो, विद्वान असलो तरी भान असलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. त्याच सोबत अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनामध्ये गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर झालेल्या शाई फेकीच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, अस संजय राऊत म्हणाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष महाराष्ट्रानं देशाला दिलेले आहेत. त्यांच्या विषयी लेखन करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं. कारण कोट्यवधी लोकांच्या भावना युगपुरुषांशी जोडल्या आहेत, असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ८ वर
- येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार- गुलाबराव पाटील
- ५० टक्के लसीकरण कोविडविरोधातील महत्वाचा टप्पा, मात्र ही गती कायम ठेवणे आवश्यक- नरेंद्र मोदी
- ‘ओमायक्रॉन’संबंधी केंद्र सरकारने कडक भूमिका घ्यायला हवी- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

