Share

‘ओमायक्रॉन’संबंधी केंद्र सरकारने कडक भूमिका घ्यायला हवी- अजित पवार

Published On: 

मुंबई : दक्षिण अफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण अनेक देशांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाने पुन्हा धास्ती घेतली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने आवश्यक ते खबरदारीची पावले उचलत आहेत. कोरोनाची लाट ओसरली नाही तोच या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. राज्यामध्येही या नव्या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळले. त्यानंतर आज(६ डिसें.) ओमायक्रॉनचा(Omicron) आठवा रुग्ण राज्यात सापडला आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात कठोर नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी याविषयी भाष्य केले आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पवारांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना(Dr.Babasaheb Ambedkar) अभिवादन केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी ‘ओमायक्रॉन’संबंधी संवाद साधतांना पवार म्हणाले की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनातील सर्वांचं यावर बारकाईनं लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाहेरचे जे रुग्ण येतात त्यासंबंधी केंद्र सरकारनेही कडक भूमिका घेतली पाहिजे. जिथे जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत तिथे नियमांचे पालन अतिशय काटेकोरपणे होते की नाही हे देखील पाहिले पाहिजे.’

दरम्यान,’यापूर्वीदेखील आपण मार्च महिन्यात अनुभव घेतला होता. एक दांपत्य दुबईवरुन आले, त्यांच्यामुळे चालकाला करोना झाला आणि तेथून फोफावला. आताही देशातील इतर राज्यात एक दोन रुग्ण दिसत होते. पण त्यांच्या फक्त कुटुंब नाही तर नातेवाईकांनाही लागण झाल्याचं दिसत आहे. खूप जण काळजी घ्या, नियमांचं पालन करा, मास्क वापरा, तीव्रता कमी आहे सांगतात. पण त्याबद्दल देश पातळीवरच आरोग्य विभागाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने एकदा भूमिका स्पष्ट केली पाहिजे,’ असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!