Share

५० टक्के लसीकरण कोविडविरोधातील महत्वाचा टप्पा, मात्र ही गती कायम ठेवणे आवश्यक- नरेंद्र मोदी

Published On: 

नवी दिल्ली: दक्षिण अफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण अनेक देशांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाने पुन्हा धास्ती घेतली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने आवश्यक ते खबरदारीची पावले उचलत आहेत. कोरोनाची लाट ओसरली नाही तोच या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. भारतामध्येही या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. असे असतांनाच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandavia)यांनी दिलासादायक माहिती दिली आहे.

मंडाविया म्हणाले की, लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. हा अभिमानाचा क्षण आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार मागील २४ तासांमध्ये १ कोटी ४ लाख १८ हजार ७०७ डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत १२७.६१ कोटी डोस दिले गेले आहेत. याच विक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी कौतुक केले आहे.

भारताच्या लसीकरण मोहिमेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला.लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. COVID-19 विरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी ही गती कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. आणि हो, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसह इतर सर्व COVID-19 संबंधित प्रोटोकॉलचे पालन करत रहा. असे आवाहन करणारे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!