जळगाव : प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी जिल्हा बँकेत आमच्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका आम्ही तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत, असे वक्तव्य केले आहे.
पुढे ते म्हणाले की,’जिल्हा बँकेवर शिवसेना, राष्ट्रवादी र्कांग्रेस व कॉंग्रेस या तीन पक्षाने एकत्रित यश मिळवून महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे. पुढच्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकांना अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपालिकेच्या निवडणुका येत्या दोन ते सहा महिन्यात लागणार आहेत. त्यात स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिले आहेत. जिथे जिथे महाविकास आघाडी होईल, तिथे तिथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीमुळे आमचे बळ वाढलेले आहे, त्यामुळे येत्या जिल्हा परिेषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार आहे,’ विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, तुम्ही तीन पक्ष या निवडणुकीत एकत्र येवू शकणार का? या प्रश्नाला उत्तर देत पाटील म्हणाले की, ‘राज्यात तीन पक्षाचे सरकार येईल असे कुणाला वाटत होते का? परंतु तीन पक्षाचे सरकार आलेच ना. जिल्हा बँक निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आलेच ना मग जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत आम्ही नक्की एकत्र येऊ.’
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ८ वर
- अशा घटना महाराष्ट्राला शोभत नाहीत; शाई फेकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
- कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे; गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकीचा राऊतांकडून निषेध
- …पण ती संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया; दरेकारांचं शाईफेकला समर्थन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

