🕒 1 min read
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी १ मे रोजी सभा घेत १४ तारखेनंतरच खरी पोलखोल सभा घेणार असल्याचा इशारा दिला. भ्रष्टाचार तसेच बाबरी पाडल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिवसेनेला चांगलेच घेरले. बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता हजर नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेनेचे अनेक नेते व शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. त्यामुळे फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल. बाबरी ढांचा कोणी पाडला याबाबत अधिक माहिती महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांच्याकडून घ्यायला हवी. भंडारी आज हयात नाहीत, पण ६ डिसेंबरला दुपारी चार वाजताच भंडारी यांनी भाजपाच्या वतीने स्पष्ट केले की, ‘‘बाबरी पाडण्यात भाजपाचा हात नसून हे कार्य शिवसैनिकांनी केले असावे.’’ भंडारी यांचे हे वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे होते. असा टोला संजय राऊत यांनी सामनातून लगावला आहे.
तसेच फडणवीस हे त्या उसळलेल्या हिंदू जनसागरातून घुसून बाबरीच्या घुमटावर चढले व हातोडे मारीत राहिले याची नोंद इतिहासाला नसावी? हे आश्चर्यच आहे. मुख्य म्हणजे तेव्हाचे अयोध्या लढ्याचे सेनापती श्री. लालकृष्ण आडवाणी यांनीही “बाबरी आम्ही पाडली नाही. बाबरी पडल्याचे कळताच मला धक्का बसला. तो आमच्यासाठी काळा दिवस होता,”, असे स्पष्ट केले होते. त्या काळ्या दिवसासाठी भाजपा आता श्रेय का घेत आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “भाजपवाले आता ऊठसूट बाबराचे भजन…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
- “चीननेही गलवान व्हॅलीत २३ भोंगे लावलेत मग…”, संजय राऊतांचे थेट आव्हान
- “संभाजीनगरात भाजपच्या उपवस्त्राने…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
- “…त्यामुळे ‘गधा’धारी कोण हे स्पष्ट झालं”, भाजप आणि मनसेच्या सभेवरून संजय राऊत यांचा टोला
- “फडणवीस ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा…”, संजय राऊतांचा खोचक सवाल


